Coronavirus Outbreak: डिसेंबर 2019 पासून जगभरात दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्ये दाखल झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान दिल्ली, हैदराबाद, तेलंगणा मध्ये COVID-19 चे रूग्ण आढळल्याने आता त्याची दहशत हळूहळू वाढायला लागली आहे. यामध्ये आता जीवघेणा कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतामध्ये भीषण स्वरूप घेऊ नये म्हणून सरकारकडून उपाययोजना राबवायला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज भारताकडून नवी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार परदेशातून भारतामध्ये येणार्या पर्यटकांसोबतच, परदेशामध्ये राहणार्या भारतीयांवरही बंधनं घालण्यात आली आहेत. Corona चा हाहाकार! चीन पाठोपाठ आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे बळी, वाचा सविस्तर.
COVID-19 च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेली नवी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी काय?
- इटली, इराण, साऊथ कोरिया, जपानच्या नागरिकांना 3 मार्च किंवा त्यापूर्वी दिलेले अशा नियमित व्हिसा/ ई व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत.
- 5 फेब्रुवारी 2020 च्या पूर्वी चीनमधील व्हिसा/ ई व्हिसा असणार्यांचा तो रद्द करण्यात आला आहे. दरम्यान अशांपैकी ज्यांना भारतामध्ये यायचं असेल तर त्यांना नजिकच्या भारतीय दूतावासाच्या कार्यालयातून नवा व्हिसा घेणं आवश्यक आहे.
- चीन, इटली, इराण, साऊथ कोरिया, जपान मध्ये 1 फेब्रुवारी किंवा त्यानंतर प्रवास केलेल्यांना भारतामध्ये प्रवेश निषिद्ध आहे. तर अशांपैकी ज्यांना भारतामध्ये येणं अत्यावश्यक असेल त्यांनी नजिकच्या दूतावासाच्या कार्यालयातून व्हिसा घेणं आवश्यक आहे.
- राजदूत, आंतरराष्ट्रीय संस्था, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, OCI cardholders आणि एअर क्रुच्या लोकांसाठी ही नियमावली लागू नसेल. मात्र त्यांना मेडिकल स्क्रिनिंग करणं आवश्यक आहे.
- दरम्यान परदेशातून येणार्या इतर पर्यटकां ना सेल्फ डिक्लरेशन फॉर्मच्या माध्यमातून स्वतःच्या आरोग्यविषयक, ट्रॅव्हल इतिहसाबद्दल माहिती देणं बंधनकारक आहे.
- सध्या कोरोना व्हायरसचा प्रभाव असलेल्या परदेशातील कोणत्याही भागातून येणार्या भारतीय व्हिसा असलेल्या व्यक्तींना ही नियमावली लागू आहे.
Travel advisory on COVID-19: All regular (sticker) Visas/e-Visa (including VoA for Japan&S Korea) granted to nationals of Italy, Iran, South Korea, Japan& issued on or before 3 March and who have not yet entered India, stand suspended with immediate effect.
— ANI (@ANI) March 3, 2020
पुढील काही दिवसांतच परीक्षांचा हंगाम संंपल्यानंतर आता सुट्ट्यांचे वेध लागायला सुरूवात होईल. समर हॉलिडेजमध्ये अनेकजण परदेशवारी करण्याचे प्लॅन करतात. परंतू चीनसह आता जगभरात वाढत असलेली कोरोना व्हायरसची दहशत पाहता तुम्ही कोणत्या देशामध्ये सुट्ट्यांचे प्लॅन बनवत आहात तेथील सध्याच्या स्थिती आहे आहे? हे एकदा पडताळून पहा. दरम्यान आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाारतीयांंना दिला आहे.