चीन (China), इटली (Italy) पाठोपाठ आता थेट अमेरिकेच्या (America) वॉशिंग्टन (Washington) मध्ये एका 50 वर्षीय नागरिकाचा कोरोना (Corona) मुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा हा पहिला बळी असला तरी अन्य चार संशियत व्यक्ती देखील आढळल्या आहेत, या व्यक्तींवर उपचार सुरु असून खबरदारी म्ह्णून अमेरिकेने अन्य नागरिकांना इराण (Iran), दक्षिण कोरिया (South Korea) आणि इटलीतील काही भागात प्रवास करण्यास मनाई केली आहे.दुसरीकडे, सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम ऑस्ट्रेलियाची (Australia) राजधानी पर्थ (Perth) येथील एका 78 वर्षीय व्यक्तीने रविवारी पहाटे सर चार्ल्स गॅर्डनर रुग्णालयात कोरोनामुळेच प्राण गमावले.
प्राप्त माहितीनुसार, वॉशिंग्टन मध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती ही यापूर्वी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली नव्हती. इजेच काय तर त्याने कोणतीही परदेशवारी केली नव्हती. यावरून अमेरिकेत नव्या करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कोरोनामुळे याआधी वुहान शहरात एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूची 60 नवीन प्रकरणे; चीननंतर सर्वात जास्त 893 व्यक्तींना लागण, देशात हाय अलर्ट जारी
दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये एक अल्पवयीन मुलाला करोनाचा 'संभाव्य संसर्ग' झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने अमेरिकेत औषधांचा तुटवडा सुद्धा भासू लागला आहे. यावर उत्तर देताना अमेरिकन आरोग्य विभागाने मूलभूत औषधे नसली तरी त्याजागी पर्यायी औषधांची व्यवस्था मात्र करण्यात आली असल्याचे सांगितले.