(Photo Credits : File Image)

चोरी करुन पसार झालेल्या चोराला पकडण्यासाठी सर्व प्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते. मात्र, बैतूलच्या (Betul) मलकापूरचे (Malkapur) गावकऱ्यांनी चोराला पकडण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. चोरलेले साहित्य परत आणू द्यावा म्हणून गावकऱ्यांनी चक्क चोरालाच पत्र लिहल्याचे समोर आले आहे. गावातील अनेक घरांवर हे पत्र चिकटवण्यात आले आहे. कोणत्या तरी घरावरचे पत्र तो चोर वाचेल आणि चोरलेले साहित्य परत आणून देईल अशी गावकऱ्यांना आशा आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

बैतूलमधल्या मलकापूरच्या गावकऱ्यांनी गावातील जुन्या मंडळीच्या आठवणीसाठी स्मानशभूमी परिसरात एकूण 70 झाले लावली आहेत. या सर्व झाडांना पाणी देण्यासाठी गावकऱ्यांनी गावाच्या निधीमधून पाईप घेतले होते. मात्र, चोरांनी ते पाईपच लंपास केले. यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, या चोरीचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने त्यांनी चोराला उद्देशून पत्र लिहिले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! पतीने सुरतला घेऊन जाण्यास नकार दिल्याने विवाहितेची कुंकू खाऊन आत्महत्या; Uttar Pradesh मधील घटना

ट्विट-

प्रिय चोर या वाक्याने या पत्राची सुरुवात केली आहे. मलकापूरच्या स्मशानभूमीत वृक्षारोपणाचे काम तुमच्यासाठीच केले जात आहे. आम्ही लावलेल्या 70 झाडे ईश्वरच्या आर्शिवादाने सुरक्षित आहेत. मात्र, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हालाही याच स्मशानभूमीत आणले जाणार आहे. त्यावेळी तुमचा मृतदेह घेऊन आल्यानंतर तुमचेच नातेवाईक, मित्र या झाडांच्या सावलीखाली बसतील. त्यावेळी ते झाडे लावणाऱ्या व्यक्तींना धन्यवाद करतील. यामुळे या स्मशानभूमीतील 70 झाडांना पाणी देणारे पाईप आणून द्यावे, अशी विनंती गावकऱ्यांनी पत्राद्वारे चोराला केली आहे.