Goa Accident: राज्यात दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरु आहे. दक्षिण गोव्यात एका अनियंत्रित खासगी बसची दोन झोपड्यांना धडक दिल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रात्रीच्या वेळीस निद्रावस्थेत असताना मजूरांच्या अंगावरून बस गेली. या अपघातात आणखी पाच मजूर गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. (हेही वाचा- भरधाव कारने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; Mumbai येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा जिल्ह्यात वेर्णा औद्योगित वसाहती येथे अपघात घडला. एका खासगी बसने झोपड्यांना धडक दिली. या धडकेत चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की, बस सहित झोपड्यांचा चुराडा झाला आहे.
#Accident|{ Four labourers killed on the spot & five others injured when a bus rammed into their shanties at Verna Industrial Estate last night.
The bus carrying workers of a private company rammed into two shanties.
Eye witnesses claim that the driver was under influence of… pic.twitter.com/D2TOjXqJXL
— Goa News Hub (@goanewshub) May 26, 2024
पोलिसांनी जखमी मजूरांना शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी एकाने असा दावा केला आहे की, बसचालक दारूच्या नशेत होता. बेदरकारपणे बस चालवण्याने हा अपघात घडून आला. अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस होती. अपघातात बसचा समोरील भागाचे नुकसान झाले आहे.