PM Narendra Modi | (Photo Credits- ANI)

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी शारदीय नवरात्र ( Navratri) आज, 29 सप्टेंबर 2019 पासून सुरू झाली आहे. या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून भारतीयांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. आज घटस्थापना हा नवरात्रीच्या सणामधील पहिला आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज 29 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरूवात होत असल्याने या दिवशी घरात घटाची स्थापना (Ghatasthapana Kalash) केली जाते. पुढील नऊ दिवस त्याची पूजा करून नवव्या म्हणजे दसर्‍याच्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरुन भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे. नवरात्री सणाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व भारतीयांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा, जय माता दी! नवरात्री हा शक्तीपूजनाचा पवित्र सण आहे. देवीने आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन उर्जा, नवीन आवेश आणि उत्साह भरो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- Happy Navratri Images HD Free Download: शारदीय नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

 

भारतात नवरात्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या सणात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. दरम्यान, देवी समोर दांडिया, रास गरबा खेळण्याची प्रथा आहे. हा गुजराती पारंपारिक नृत्य प्रकार असला तरीही मुंबई, पुणे सारख्या मेट्रो सिटीजमध्ये तरूणाईमध्ये त्याची खास क्रेझ आहे. महाराष्ट्रामध्ये महिला 'भोंडला' हा पारंपारिक खेळ खेळतात.