Happy Navratri Images and Wishes in Marathi: अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी शारदीय नवरात्र ( Navratri) यंदा आज, 29 सप्टेंबर 2019 पासून सुरू झाली आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांचा हा उत्सव घटस्थापना (Ghatasthapana) करून केला जातो. या शरद ऋतूमध्ये नवरात्री साजरी करण्यासोबतच रात्री देवी समोर दांडिया, रास गरबा खेळण्याची प्रथा आहे. हा गुजराती पारंपारिक नृत्य प्रकार असला तरीही मुंबई, पुणे सारख्या मेट्रो सिटीजमध्ये तरूणाईमध्ये त्याची खास क्रेझ आहे. महाराष्ट्रामध्ये महिला 'भोंडला' (Bhondla) हा पारंपारिक खेळ खेळतात. त्यामुळे केवळ धार्मिक कारणांसाठी नव्हे तर तरूणाईला या सणासोबत येणार्या 'गरब्या नाईट्स'चं, मंगलमय वातावरणामध्ये येणारी उर्जा आणि नऊ दिवस नऊ रंगांमध्ये सजून नटून येणारं चैतन्य तुमच्यासोबतच नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासोबत HD Images & Wishes,Wallpapers च्या स्वरूपात WhatsApp, Facebook Messenger द्वारा शेअर करा. आज असलेल्या घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करा. Navratri 2019: घटस्थापना कशी करावी, त्याचे विधी, शुभ मुहूर्त काय? इथे पहा.
नवरात्र ही आदिशक्तीची, नव निर्मितीची पूजा करण्याचा काळ असतो. महाराष्ट्रासह देशभरात विविविध स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये 'दुर्गा पूजा' मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तर दक्षिण भारतामध्ये 'गोलू' साजरा केला जातो. घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यासोबतच 'कन्या पूजन' किंवा बालिका पूजन याला देखील नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व असते. मग आज पासून पुढील दहा दिवसांच्या या धामधूमीच्या सणाला दणक्यात सुरूवात करा. या नवरात्रीच्या मंगल पर्वाची सुरूवात ही ग्रीटींग्स शेअर करून करा. Navratri 2019: 'दगडी चाळीची आई माऊली', 'टेंभी नाका दुर्गेदुर्गेश्वरी' सह मुंबई, ठाणे मध्ये या सार्वजनिक नवरात्र मंडळांमध्ये खास असतो शारदीय नवरात्रोत्सव; पहा तेथे कसे पोहचाल?
शुभ नवरात्री मराठी शुभेच्छा
आजपासून सुरू झालेली नवरात्र तुमच्या आणि प्रियजनांच्या सार्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फलदायी ठरू दे! या प्रार्थनेला ग्रीटींग्स, शुभेच्छापत्र यांच्या माध्यमातून शेअर करा आणि आमच्या LatestLY परिवाराकडूनची तुम्हांला शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!