
West Bengal: माणुसकीला काळीमा फासणारी अशी घृणास्पद घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 29 वर्षीय तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली. ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी भागातील आहे. गाभण गाईच्या मालकाने फिर्याद दिल्यानंतर आरोपी प्रद्युत भुईया याला अटक करण्यात आली.
स्थानिक आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर चंदनपिडी येथील रहिवासी आरती भुईया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती की काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी असलेल्या प्रद्युतने त्यांच्या घरामागील गोठ्यात प्रवेश केला आणि त्यांच्या एका गायीवर 'पाशवी बलात्कार' केला. मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. (हेही वाचा -पत्नीने पतीला कार्यालयात भेटणे, सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरता; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय)
आरोपी प्रद्युतविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी त्याला काकद्वीप उपविभागीय न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चंदनपिडी गावातील एका रहिवाशाने सांगितले, "प्रद्युतवर असंख्य आरोप आहेत. त्याने यापूर्वी शेतातील शेळ्या, वाहने आणि भाजीपाला चोरला होता."