छत्तीसगड उच्च न्यायालयाने अलीकडेच म्हटले आहे की, पत्नीने वारंवार पतीच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणे, अपमान करणे आणि पतीच्या सहकाऱ्यांसमोर असे दृश्य निर्माण करणे हे पतीला घटस्फोट घेण्यास पात्र ठरणारा क्रूरपणा आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर पत्नीच्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.
Wife visiting husband in office, abusing him in front of colleagues amounts to cruelty: Chhattisgarh High Court
report by @whattalawyer
Read story: https://t.co/OTg7PVSpW9 pic.twitter.com/0EUs4Jw9SW
— Bar & Bench (@barandbench) August 31, 2022