What Is TINA Factor? 'टीना फॅक्टर' वापरत अरविंद केजरीवाल यांनी केला पंतप्रधान मोदी, शाह यांच्या भाजपचा पराभव
Arvind Kejriwal, Narendra Modi, Amit Shahi | (Photo credit: archived, edited, symbolic images)

What Is The TINA Factor: दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Vidhan Sabha Election 2020) मध्ये आम आदमी(Aam Aadmi Party) पक्ष बहुमताने विजयी झाला असून, भारतीय जनता पक्ष पराभवाचा सामना करत आहे. या विजयामुळे अरविंद केजरीवल यांनी निवडणूक स्ट्रॅटेजी (AAP Election Strategy) म्हणून वारपलेला टीना फॅक्टर (TINA Factor) कामी आला अशी चर्चा सुरु झाली आहे. तसोच, मतमोजणी त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रभावापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा झंजावत फिका पडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. म्हणूनच जाणून घेऊया काय आहे टीना फॅक्टर?

शिला दिक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा विक्रम

अरविंद केजरीवाल हे सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बणण्याकडे वाटचाल करत आहेत. काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शिला दिक्षीत यांच्यानंतर प्रथमच एक व्यक्ती सलग तिसऱ्यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री बनत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हा करीश्मा करुन दाखवला आहे. लोकसभा निवडणूक 2019 भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरुन लढली. तेव्हा त्यांना 303 जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची तर दिल्लीत अनामत रक्कमही जप्त झाली. लोकसभेतील पराभवातून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी धडा घेतला आणि आपली कार्यपद्धती कामय ठेवत रणनिती (स्ट्रॅटीजी) मात्र बदलली.

टीना फॅक्टर म्हणजे काय? (What is the TINA Factor?)

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप यांच्या निवडणूक प्रचारतंत्र आणि स्ट्रॅटेजीला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. साधारण लोकसभा निवडणूक 2014 पासून भारतीय जनता पक्ष जनतेला सांगत आला आहे की, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान म्हणून आणि नेता म्हणून देशाला पर्याय नाही. 2019 लोकसभा निवडणुकीनंतर केजरीवाल यांनी अशीच स्ट्रॅटेजी अवलंबली. आम आदमी पक्षानेही प्रचार मोहीम हाती घेत दिल्लीकरांवर बिंबवले की, दिल्लीसाठी अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय इतर कोणता पर्यायच नाही. या स्ट्रॅटेजीला 'टीना' (TINA) फॅक्टर म्हणतात. टीना म्हणजे देयर इज नो अल्टरनेटिव (There Is No Alternative).

Arvind Kejriwal | (Photo Credits-Twitter)

कसा केला TINA चा वापर?

पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रवाद हा मुद्दा हाती घेत निवडणूक लढली होती. त्याचा भाजपला फायदा झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने भाजच्या राष्ट्रवादाला स्थानिक मुद्द्यांनी उत्तर दिले. दिल्लीमध्ये भाजपने राष्ट्रवादाचा वापर केला. मात्र, त्याला केजरीवाल यांच्या 'टीना' फॅक्टरने जबरदस्त उत्तर दिले. भाजप इतर राज्यांच्या निवडणुकीत जो प्रश्न विचारते तोच प्रश्न आपने दिल्लीत भाजपला विचारला. तो म्हणजे दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? गृहमंत्री अमित शाह यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. परंतू, तरीही भाजप आपला रोखू शकली नाही. (हेही वाचा, भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार)

Prime Minister Narendra Modi, CM Arvind Kejriwal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

..अन अरविंद केजरीवाल यांनी स्ट्रॅटीजी बदलली

विधानसभा निवडणूक 2015 आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार आपल्याला काम करु देत नाही अशी तक्रार करत होते. 2015 मध्ये आम आदमी पक्षाने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, 2015 मध्ये आपला चांगले यश मिळूनही 2017 मध्ये झालेल्या एमसीडी निवडणुकीत एकूण 272 जागांपैकी भाजपने तब्बल 181 तर, आपला केवळ 49 जागाच मिळाल्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही आपला फटका बसला. त्यानंतर केजरीवाल यांनी आपली रणनिती बदलली. पर्यायाने इथे 'टीना' फॅक्टर कामी आला.

Arvind Kejriwal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आपणे अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना टाळला

सुरुवातीच्या काळात अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत होते. परंतू, पुढे जाऊन त्यांनी आपली रणनिती बदलली. आणि थेट मोदी यांच्यावर टीका करणे टाळले. त्यामुळे भाजपलाही अरविंद केजरीवाल यांच्यावर फारसा आक्रमक प्रचार करता आला नाही. तसेच, भाजपकडून केजरीवाल यांच्यावर ज्या पद्धतीने आक्रमक टीका आणि प्रचार केला. तो सर्व प्रचार नकारात्मक होता. त्याचाही फायदा केजरीवाल यांनाच झाला.

दरम्यान, आम आदमी पक्षास मोफत पाणी, वीज, बस अशा घोषणा आणि योजनांचाही फायदा झाला. आम आदमी पक्षाची मतं कोपणाऱ्या काँग्रेसचाही फारसा उपद्रव आपला झाला नाही. शाहीन बाग मुद्द्यावरही भाजपने आपला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतू, भाजपचा आक्रमक राष्ट्रवाद अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने परतवून लावला.