क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता | (Photo credit: Virender Sehwag, official Facebook account)

Lok Sabha Elections 2019: क्रिकेटच्या मैदानावरील धावांच मशीन अशी ओळख असलेला क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आता राजकारणाच्या मैदानावरही फटकेबाजी करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) जोरदार तयारी करत आहे. या तयारीचा भाग म्हणून भाजप अनेक सेलिब्रेटी आणि चर्चित चेहऱ्यांना पक्षप्रवेशासाठी गळाला लावत आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवागलाही भाजपने गळ टाकला असून, तो हाती लागल्यास त्याला हरियाणा (Haryana) राज्यातून उमेदवारी देण्याची भाजपची हालचाल असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांचा मुलगा आणि खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांच्या विस्तारीत राजकारणाला आळा खालण्यासाठी विरेंद्र सेहवागला मैदानात उतरवण्याचा भाजपचा विचार आहे. दीपेंद्र हुड्डा यांनी रोहतक लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रीक केली आहे. ते याच मतदारसंघातून आता चौथ्यांदा विजयी होण्याची मनीशा बाळगून आहेत. (हेही वाचा, खल्लास..! ईशा कोप्पीकर देणार कमळाला साथ, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश)

अमर उजालाने याबाबत विस्तारीत वृत्त दिले आहे. अमर उजालाने म्हटले आहे की, 27 फेब्रुवारीला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होऊ शकते.