Video: नितिन गडकरी यांना जवाहरलाल नेहरु यांचे 'ते' भाषण फार आवडते
Nitin Gadkari | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) काँग्रेस (CONGRESS) आणि गांधी-नेहरु कुटुंबाचे (Nehru–Gandhi family) किती वावडं आहे हे जवळपास सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजप आणि आरएसएस काँग्रेस, नेहरु-गांधी परीवारावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. असे असले तरी, स्पष्टवक्तेपणा आणि मनमोकळे व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari)यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु ( Jawaharlal Nehru) यांच्या भाषणाचे आणि त्यांनी मांडलेल्या विचारांचे कौतुक जाहीररित्या केले आहे. नेहरु यांचे एक भाषण आपणास फार आवडते, असे सांगत गडकरी यांनी नेहरुंच्या भाषणातील एका वाक्याचा संदर्भही दिला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी यांनी भाषणादरम्यान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या एका भाषणातील वाक्याचा संदर्भ दिला. नेहरुंचा उल्लेख करत ते म्हणाले, 'लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही.' नेहरु यांचे हे भाषण मला खूपच आवडतं, असेही गडकरी म्हणाले.

यावेळी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना गडकरी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे एखाद्याने चुकीचं केलं तर आपणही त्याला तशीच प्रतिक्रया द्यायची ही मानसिकता ठीक नाही. नेहरुंनी म्हटले होते की, भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंच भाषण आपल्याला फार आवडतं असंही गडकरी यावेळी म्हणाले. (हेही वाचा, भाजपमध्ये खळबळ! मोदींना हटवा, गडकरींना पाठवा; शेतकरी नेत्याची आरएसएसकडे मागणी)

दरम्यान, गडकरी यांनी या वेळी बलताना लोकशाही, निवडणुका, संसदीय शासन प्रणाली, मतदान, विकास अशा अनेक विषयांवर भाष्य केले. आपल्या भाषणात गडकरी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली.