Amit Shah Health Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच AIIMS मधून दिला जाणार डिस्चार्ज
Amit Shah | (Photo Credits: BJP4India)

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती जवळजवळ सुधारली आहे. त्यामुळे आता त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. या वृत्ताची पृष्टी दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने केली आहे. एम्स यांनी असे म्हटले आहे की, गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच घरी पाठवले जाऊ शकते. कोविड19 नंतर प्रकृती सुधारली तरीही त्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.

गेल्या 18 ऑगस्टला अमित शहा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स यांनी एका विधानात असे म्हटले होते की, त्यांना तीन दिवसांपासून अंग दुखी आणि थकवा जाणवत होता. यापूर्वी त्यांना गुरुग्राम स्थित असलेल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.(कोरोनातून बरे झालेल्या आणि ब्लड प्लाझ्मा दान केलेल्या रुग्णांच्या कुटूंबाला गोवा सरकारकडून विशेष Health Incentives देण्याची घोषणा)

याआधी 55 वर्षीय अमित शहा यांनी 2 ऑगस्ट रोजी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर अमित शहा यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु कोरोनावर मात केल्यानंतर अमित शहा यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शाह यांचा 14 ऑगस्टला कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज दिला होता.

अमित शहा यांनी ट्वीट करत असे ही म्हटले होते की, आज माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे धन्यवाद मानतो. ज्या लोकांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या त्यांचे सुद्धा आभार मानतो. नातेवाईकांनी सुद्धा माझा आत्मविश्वास वाढवला त्यांचे ही आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे.