कोरोनातून बरे झालेल्या आणि ब्लड प्लाझ्मा दान केलेल्या रुग्णांच्या कुटूंबाला गोवा सरकारकडून विशेष Health Incentives देण्याची घोषणा
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

देशात सर्वात कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात पुन्हा नव्याने कोरोना संक्रमितांची भर पडत गेली. ज्याचा परिणाम आजवर गोवा (Goa) राज्यात 16,006 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 175 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने (Health Ministry of Maharashtra) दिली आहे. सद्य घडीला गोव्यात 3,535 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र आतापर्यंत जवळपास 12,296 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यापैकी ज्या रुग्णांनी बरे झाल्यानंतर आपल्यातील ब्लड प्लाझ्मा (Blood Plasma) गरजू कोविड-19 (COVID-19) च्या रुग्णांना दान केले अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या कुटूंबियांना गोवा सरकारने विशेष आरोग्य सेवा देण्याची घोषणा केली आहे.

गोवा सरकारने या रुग्णांच्या कुटूंबाला विशेष Health Incentives देण्याची घोषणा केली आहे. कोविड-19 वर इलाज करत असताना रुग्णांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. अशा वेळी त्यांच्या शरीरात तयार झालेले ब्लड प्लाझ्मा काही रुग्णांनी गरजू रुग्णांना देऊन त्यांची एक प्रकारची मदत केली आहे. Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 34 कोटींचा टप्पा; 76,472 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह 1,021 मृत्यू

देशाचा एक दक्ष नागरिक म्हणून या रुग्णांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याने त्यात खारीचा वाटा उचलत गोवा सरकारने या रुग्णांच्या कुटूंबियांना हे विशेष आरोग्य भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.