Photo Credit- X

काँग्रेसने Srinivas B V यांच्यानंतर उदय भानू चिब(Uday Bhanu Chib) यांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे उदय भानू चिब यांनी श्रीनिवास एस बी यांची जागा घेतली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे. "काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उदय भानू चिब, जे सध्या भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. यांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तात्काळ नियुक्ती केली आहे.", असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा: Sanjay Gaikwad On Rahul Gandhi: 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस'; संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान)

दरम्यान उदय भानू चिब यांची नियुक्ती जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान करण्यात आली आहे. त्यामुळे या बदलाचा काँग्रेसला चांगला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियुक्तीनंतर उदय भानू चिब हे युवक काँग्रेसच्या युनिटचे नेतृत्व करतील. चिब हे जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचाही भाग आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला, उदय भानू चिब यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अजय कुमार सधोत्रा ​​यांच्या रोड शोमध्ये भाग घेतला होता. अजय कुमार सधोत्रा यांनी जम्मू उत्तर विधानसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.