CWC Meeting: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम, पुढील 6 महिन्यात नव्या प्रमुखाची निवड होणार असल्याचा CWC बैठकीत निर्णय
Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेस वर्किंग कमिटीची (CWC)  7 तासांच्या बैठकीनंतर अखेर सोनिया गांधीच (Sonia Gandhi) सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीडब्लूसीच्या बैठकीत हा निर्णय मंजूर झाला असून त्याच आता अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्याचसोबत पुढील 6 महिन्यात नव्या प्रमुखाची निवड होईल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरुन आज पक्षाच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसंबंधित उघडपणे बातचीत झाली. त्यावेळी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी असे म्हटले होते की, त्यांना पक्षाचे अध्यक्षपद पुढे सांभाळायचे नाही आहे. परंतु काही नेत्यांनी सोनिया गांधी यांनी त्या पदावर कायम रहावे यासाठी अपील ही केले होते.

सीडब्लूसीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष पदावरुन राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत या पदासाठी नव्या अध्यक्षाची निवड करावी असे ही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एके एंटनी सह अन्य काही नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पदावर कायम रहावे असे म्हटले होते.(CWC Meeting: कपिल सिब्बल राहुल गांधी यांच्यावर भडकले; भाजपा सोबत 'संगनमत' असल्याच्या टीकेवर नोंदवला आक्षेप)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, CWC ची ही बैठक सोनिया गांधी यांना 2 आठवड्यांपूर्वी लिहिण्यात आलेल्या एका चिठ्ठीवरील प्रतिक्रियेसंबंधित बोलावली होती. कमीत कमी 23 नेते जे CWC चे सदस्य, UPA सरकार मधील माजी मंत्री राहिलेले नेते आणि खासदारांनी सोनिया गांधी यांना संगठनेच्या मुद्द्यावरुन चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत असे म्हटले होते की, सशक्त केंद्रीय नेतृत्वासह पक्ष चालवण्यासाठी योग्य रणनितीच्या मुद्द्यावर भर देण्यात आला होता. यामध्ये पुढे असे ही लिहिण्यात आले होते की, नेतृत्व असे असावे जे सक्रिय आणि जमिनीवर काम करताना दिसून यायला हवे.

मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता अजय सिंह यांनी चिठ्ठीसंबंधित असे म्हटले आहे की, त्यामध्ये कोणताही व्यक्ती किंवा गांधी परिवाराच्या विरोधात नव्हते. ती फक्त एक सुचना होती. सोनिया गांधी यांना पदावर रहायचे नाही आहे. अशातच जर राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा कारभार सांभाळण्यास तयार असल्यास तर ठीक आहे. पण नाही तर पक्षाने नेतृत्व पार्टीच्या संविधानाअंतर्गत विचार करुन निर्णय घ्यावा.(काँग्रेस च्या हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सोनिया गांधी) 

दुसऱ्या बाजूला दिल्लीत काँग्रेस काउंसलर संदीप तंवर यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबद्दल निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. त्यांनी असे म्हटले की, चिठ्ठी ही राहुल गांधी यांनाच अध्यक्षपद मिळावे या हेतूने लिहिली आहे. त्याचसोबत जर राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद न दिल्यास तर तो निर्णय पक्षाच्या हितासाठी नसणार आहे.