Ashok Gehlot | (Photo Credit: ANI)

राजस्थानमधील मजबूत बहुमतात असलेले सरकार अस्थिर करण्याचे आणि पाडण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहेत. त्यासाठी CBI, IT,ED या संस्थांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणवर गुंडागर्दी सुरु आहे. सचिन पायलट यांचे मोठे षडयंत्र काँग्रेस पक्षने उधळून लावले, असे राजस्थानचे मुख्यमनंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अशोक गहलोत यांनी सचिन पायलट (Sachin Pilot) आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. या वेळी सचिन पायलट यांनी इतका पैसा आणला कोठून असा सवालही गेहलोत यांनी केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी भाजपकडून हे सगळे केले जात आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत असेल एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी काँग्रेस पक्ष वकिलांची फी देईल. मात्र, हरीष साळवे आणि मुकुल रोहतगी यांच्यासारखे तगडे वकील देण्यासाठी सचिन पायलट यांनी पैसा आणला कोठून? साळवी, रोहतगी हे कॉर्पोरेट हाऊसेसचे वकील आहेत. कोर्टात केस लढवण्यासाठी ते 40 ते 50 लाख रुपये फी घेतात. हा पैसा त्यांनी आणला कोठून? असा सवालही गहलोत यांनी विचारला आहे.

दरम्यान, CBI, IT,ED या संस्थांना हाताशी धरुन देशात गुंडागर्दी केली जात आहे. अनेकांच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासठी केले जात आहे. भाजपने काँग्रेसच्या आमदारांना बंदी बनवले आहे. हे आमदार परत काँग्रेससोबत येऊ इच्छितात परंतू, त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवले जात आहे. त्यांचे फोन हिसकावून घेण्यात येत आहेत, असा आरोपही गेहलोत यांनी केला. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना SOG ची नोटीस; राजस्थान Rajasthan Audio Clip आमदार घोडेबाजार प्रकरण)

कोणत्याही पक्षाच्या आमदारांना हॉटेल, रिसॉर्टवर ठेवणे अत्यंत वेदनादा आहे. तसेच कोणत्याही पक्षाला शोभा देणारे नाही. तरीही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. हे अत्यंत वेदनादाई आहे, असेही गहलोत यांनी म्हटले आहे.