Rajasthan Political Crisis: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना  SOG ची नोटीस; राजस्थान Rajasthan Audio Clip आमदार घोडेबाजार प्रकरण
Gajendra Singh Shekhawat | (Photo Credits: Facebook)

राजस्थानमधील राजकीय नाट्यामध्ये केंद्रस्थानी आलेल्या कथीत Rajasthan Audio Clip प्रकरणात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज हा गजेंद्र सिंह शेखावत यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून SOG ने शेखावत यांना नोटीस बजावली आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या दिल्ली येथील निवास्थानी हे नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, चौकशीसाठी शेखावत यांची वेळही मागण्यात आल्याचे समजते.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नैतिक जबाबादारी स्वीकारुन शेखावत यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा असेही काँग्रेसने म्हटले आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आणि राजस्थान सत्ताकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या कथीत ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. ही कथीत क्लिप 17 जुलै रोजी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. या क्लिपची सत्यता अद्याप पुढे आली नाही.  (हेही वाचा, Rajasthan High Court: काँग्रेस पुढाऱ्यांचे संभाषण कोणी चोरुन ऐकले तर बरेच गौप्यस्फोट होतील- शिवसेना)

दरम्यान, काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत शेखावत यांनी म्हटले आहे की, ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नाही. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. दरम्यान, काँग्रेसने आरोप केला आहे की, शेखवत हे आपल्या आवाजाचा नमुना देण्यास नकार देत आहेत.