पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटची 'मन की बात' येत्या 26 मे रोजी करणार?
नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI/File)

2014 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विजय झाला होता. तसेच पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' (Man Ki Baat) हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांमधून मोदी यांनी विविध मुद्द्यांवर देशातील जनतेसोबत संवाद साधला.

तर मोदी यांनी 23 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या 'मन की बात' कार्यक्रमात त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी पुन्हा तुमच्या सोबत संवाद साधणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमचा भाग प्रसिद्ध केला नाही. मात्र येत्या 26 मे रोजी मोदी त्यांची शेवटची 'मन की बात' या दिवशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Exit Poll Results: पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नकारात्मक प्रचार काँग्रेसला पडला भारी?)

परंतु रविवारच्या दिवशी आजवर मोदी यांनी मन की बात मधून देशातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यामुळे मे महिन्यातील शेवटच्या रविवारी 26 तारीख येत असल्याने या दिवशी शेवटचा भाग प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र शेवटच्या मन की बात मध्ये राजकीय विषय नसल्याचे बोलले जात आहे.