नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI/File)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (29 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या वेळेस या कार्यक्रमातून देशातील नागरिकांसोबत जोडले जाणार आहेत. आजपासून सुरु झालेल्या नवरात्रौत्सवासह अन्य सण आणि 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या गांधी जयंती निमित्त आणि स्वच्छ भारत अभियानाबाबत आपल्या भावना व्यक्त करण्याची शक्यता आहे. त्याचोसबत 2 ऑक्टोंबर पासून देशात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार असल्याचे ही मोदी यावेळी सांगतील याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की, भारतीय जवानांनकडून तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक बाबत नरेंद्र मोदी मन की बात मधून बोलणार आहेत. भारतीय जवानानांनी 18 सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करत उरी येथे हल्ला केला होता. तर भारताची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून त्याला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत.(सात दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर पीएम नरेंद्र मोदी भारतात परत; विमानतळावर जंगी स्वागत, पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार)

तर विदेशी दौऱ्यावर शनिवारी परत आलेले नरेंद्र मोदी आज मन की बात मधून विविध मुद्द्यासंबंधित देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीच्या मदतीने मन की बात हा कार्यक्रम ठेवतात. यापूर्वी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी भारताची एक महत्वपूर्ण मोहिम चांद्रयान 2 याबाबत त्यांचे विचार मांडले होते. त्याचसोबत प्लास्टिक बंदीबाबतचा संकल्पसुद्धा त्यावेळी व्यक्त केला होता.