सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी भारतात परत आले. रात्री 8.10 वाजता त्यांचे विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर (Palam Airport) पोहोचले. यावेळी विमानतळावर त्यांचे अतिशय जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर दिल्लीचे सात खासदार उपस्थित होते. सोबतच हजोरांच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता. विमानतळाबाहेर भाजपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मोदींच्या स्वागतासाठी पालम विमानतळाबाहेर एक व्यासपीठ तयार करण्यात आले होते.
Prime Minister Narendra Modi arrives in Delhi, after concluding his visit to the United States of America. pic.twitter.com/nTnzzHSvus
— ANI (@ANI) September 28, 2019
यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, 'मी संपूर्ण देशाला सलाम करतो, मी 130 कोटी भारतीयांना नमन करतो. 2014 मधील निवडणुका जिंकल्यानंतर युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये मी गेलो होतो, आता 2019 मध्येही गेले. पण या दोन्ही भेटीमधील फरक मला जाणवला. आता जगाच्या दृष्टीने भारताबद्दलचा आदर आणि अभिमान वाढला आहे, त्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे, 130 कोटी भारतीयांनी अधिक सामर्थ्याने पुन्हा एकदा हे सरकार स्थापन केले. यावेळी मी अमेरिकेत या गोष्टीचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात पाहिले आहे. जगभर पसरलेल्या आपल्या भारतीयांनी आपापल्या देशातल्या त्या देशातील लोकांचेही प्रेम जिंकले आहे,’
यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्यावेळी भारतीय जवानांनी दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांनी अभिवादन केले. पुढे ते म्हणाले, ‘उद्यापासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. शक्तीपूजनाचा उत्सव भारताच्या कानाकोपऱ्यात सुरू होत आहे. दुर्गापूजा महोत्सव सुरू होत आहे. या पवित्र उत्सवाबद्दल मी सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा देतो.’ (हेही वाचा: Global Goalkeeper Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'स्वच्छ भारत अभियान' करिता बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गौरव)
दरम्यान, पीएम मोदी यांनी अमेरिकेच्या दौर्याच्या वेळी टेक्सासमधील हॉस्टन येथे हाउडी मोदी कार्यक्रमास संबोधित केले. याव्यतिरिक्त, त्यांनी बर्याच देशांच्या प्रमुखांशी भेट घेतली आणि बर्याच व्यवसाय सभांमध्ये भाग घेतला. त्यांनी काल युएनजीएलादेखील संबोधित केले.