Global Goalkeeper Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'स्वच्छ  भारत अभियान' करिता बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गौरव
Narendra Modi And Bill Gates (Photo Credit: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 'बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन'कडून (Bill And Melinda Gates) सन्मानित करण्यात आले आहे. देशात स्वच्छता अभियानाचे (Swachh bharat Campain) यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांना फाऊंडेशनचा प्रतिष्ठित 'ग्लोबल गोलकीपर्स' पुरस्कार (Global Goalkeeper Award) देण्यात आला आहे. यावेळी बिल अॅण्ड मिलिंदा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स (Bill Gates) यांनी स्वत: नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी पुरस्काराचे श्रेय भारतीयांना (Indian Citizen) दिले आहे. ज्या भारतीयांनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्वोच्च प्राथमिकता दिली, त्यांना हा पुरस्कार समर्मित करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हटले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात महत्वाचे निर्णय घेवून भारतीय नागरिकांना आकर्षित केले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छताच्या दृष्टिकोनातून 'स्वच्छ भारत अभियान' हे अधिक महत्वाचे उचलले पाऊल आहे. नरेंद्र मोदी हे नेहमी त्यांच्या भाषणात स्वच्छताविषयी जनजागृती करताना अनेकदा दिसले आहेत. यामुळे बिल गेट्स फाउंडेशनने त्यांचा प्रतिष्ठित पुरस्कार यावेळी नरेंद्र मोदी यांना दिला आहे. फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी स्वत: नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर्स हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार भारतीयांना समर्पित केला आहे. ज्या भारतीयांनी या अभियानाचे जन आंदोलनात रुपांतर केले, ज्यांनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्वोच्च प्राथमिकता दिली त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे मोदींनी म्हटले आहेत. भारत स्वच्छतेसाठीचे आपले लक्ष्य प्राप्त करण्याच्या जवळ आहे, असेही ते म्हणाले. हे देखील वाचा-केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे मोठे विधान, राजकारणातून निवृत्त होण्याचे दिले संकेत.

ANI चे ट्वीट-

भारतात दुसऱ्या अभियानांवरही काम सुरु आहे. तसेच भारतात 'फिट इंडिया' चळवळीच्या माध्यमातून तंदुरस्त आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरु केले आहे, असेही ते म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, 'जल जीवन मिशन' अंतर्गत आमचे लक्ष हे जल संरक्षण आणि पुनर्वापरावर आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत राहिल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.