
केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. आज मंगळवारी पत्रकारांशी चर्चा करताना गिरीराज सिंह यांनी मुजफ्फरपूर (Muzaffarpur) येथे त्यांच्या निवृत्तीचा विषय मांडला आहे. गिरीराज सिंह यांचा राजकीय कार्यकाळ समाप्त होणार असल्याचे, त्यांनी सांगितले आहे. गिरीराज सिंह यांचे विधान अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांना जे करायचे होते, ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करुन दाखवले आहे. दरम्यान, अनुच्छेद 370 (Artical 370) मुद्दा उपस्थित करुन गिरीराज सिंह यांनी नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गिरीराज यांच्या निर्णयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, कोणतेही पद मिळावे या हेतूने राजकारणात आलो नसल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले आहे. अनुच्छेद 370 ला त्यांचा विरोध होता. तसेच अनुच्छेद 370 समानतेच्या विरोधात असल्यामुळे त्याला रद्द करण्यात यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे, असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- बालाकोट' निवडणूकांच्याच वेळीच कसे आठवते? राष्ट्रवादी खासदार माजिद मेमन यांचा लष्करप्रमुख बीपीन रावत यांना सवाल
भाजपाचे आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे गिरीराज सिंह म्हणाले की, "नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या 5 वर्षांत आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. यानंतर माझे राजकारण करण्याचे उद्देश काय असेल?" असा प्रश्न त्यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. गिरीराज सिंह यांना कट्टर हिंदू नेते म्हणून ओळखले जाते. गिरीराज सिंह यांनी बिहारमध्ये मंत्रीपददेखील भूषवले आहे.