बालाकोट' निवडणूकांच्याच वेळीच कसे आठवते? राष्ट्रवादी खासदार माजिद मेमन यांचा लष्करप्रमुख बीपीन रावत यांना सवाल
Majid Memon And Bipin Rawat (Facebook/Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Assembly Election 2019) तोंडावर आली आहे. या दरम्यान, प्रत्येक राजकीय नेता आपली बाजू मांडून विरोधकांवर टीका करत आहेत. परंतु, या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते (National Congress Party) माजिद मेमन (Majid Memon) यांनी थेट लष्करप्रमुख बिपीन रावत (Army chief Bipin Rawat) यांच्यावर निशाणा साधला आहे. बालाकोटमध्ये 500 दहशतवादी घुसण्याची तयारी करत आहेत, असे रावत यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर मेमन यांनी नाराजी दर्शवत निवडणूका जवळ आल्यावरच बालाकोटची कशी आठवण येते? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बालाकोट हल्ला होऊन काही महिने उलटून गेले आहेत. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा पुलवामा आणि बालकोट हल्लाच्या विषय लोकांसमोर मांडून त्याचे मन विचलित करण्याचे प्रयत्न करत आहेत, असे मेमन म्हणाले आहेत. यातच भारतीय लष्कर प्रमुख रावत यांनी बालाकोट येथे 500 दहशतवादी घुसणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे रावत यांच्या वक्तव्यावर मेमन यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले की, भारतीय लष्कराने सरकारच्या प्रचार यंत्रणेचा भाग बनू नये. हे त्यांच्यासाठी चांगले नाही. गेल्या अनेक दिवस झाले आहेत, पुलवामा आणि बालाकोट यांच्याशी निगडीत काही बातम्या कानावर पडत आहेत. मात्र, त्यांचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही, असे बोलत मेमन यांनी रावत यांच्या टाईमिंगवर बोट ठेवले आहे. हे देखील वाचा- आसाराम बापूला जोधपूर कोर्टाचा दणका; बलात्कार प्रकरणी जन्मठेप रद्द करण्याची याचिका फेटाळली

CNN News 18 यांचे ट्वीट-

लष्करप्रमुख बिपीन रावत काय म्हणाले होते?

भारतीय सैनिकांनी बालाकोट येथे घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तान सुधरला नाही. बालाकोट येथे पुन्हा दहशदवाद्यांनी तळ सुरु केले असून जवळपास ५०० हून अधिक दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत.

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ची घोषणा शनिवार, 21 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. या दिवसापासून प्रत्येक राजकीय पक्ष विरोधी पक्षावर टीका करण्याची संधी शोधत आहे.