आसाराम बापूला जोधपूर कोर्टाचा दणका; बलात्कार प्रकरणी जन्मठेप रद्द करण्याची याचिका फेटाळली
Asaram Bapu (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शहाजहांपूर (Shahajahanpur)  येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू (Asaram Bapu) यांना जोधपूर कोर्टाने (Jodhpur Court) आणखीन एक दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणी (Rape Case) आसाराप बापूला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका राजस्थान हायकोर्टाच्या जोधपूर खंडपीठाने सोमवारी (23 सप्टेंबर) रोजी फेटाळून लावली. आसाराम बापूच्या शिक्षा माफीची याचिका फेटाळल्याची ही दुसरी वेळ आहे. तरीही, सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आसाराम बापूकडून आणखीन एक नवी याचिका राजस्थान कोर्टात दाखल करण्यात आली आहे, ज्यावर येत्या वर्षात म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार,शहाजहांपूर येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी विशेष एससी-एसटी कोर्टाने मागील वर्षी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. संबंधित मुलीने आध्यात्माचे धडे घेण्यासाठी आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा आश्रमात प्रवेश घेतला होता. यानंतर 15 ऑगस्ट 2013 रोजी आसारामने तिला जोधुर येथील मनाई येथील आश्रमात बोलावून तिथेच तिचा बलात्कार केला असा आरोप आहे.बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बाबू यांच्या जीवनावर बायोपिक; उलगडणार वादग्रस्त आयुष्य

ANI ट्विट

दरम्यान, आसाराम याचा मुलगा नारायण साई देखील बलात्कार प्रकरणी दोषी सिद्ध झाला होता. तब्बल 11 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत 2 बहिणींनी सुरत या पिता-पुत्रावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. यातील एका मुलीवर आसाराम बापूंनी तर तिच्या बहिणीवर नारायण साईने बलात्कार केला होता. ज्यांनंतर सुरत येथील सत्र न्यायालयाने बलात्कार, अनैसर्गिक सेक्स आणि कायद्याची धमकी दिल्याच्या आरोपांतर्गत त्याला देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.