Rahul Gandhi (PC - PTI)

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. केरळ येथील कलपेटा रॅलीला संबोधित करता राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की, नाथूराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा एकसारखीच आहे. या दोघांच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक जाणवून येत नाही. मात्र नरेंद्र मोदी यांच्यात बोलण्याची हिंमत नाहीय की ते नाथूराम गोडसे यांच्यावर विश्वास ठेवतात. दरम्यान, नाथूराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. गोडसे सगळ्यांचाच तिरस्कार करायचे. हिच अवस्था आपल्या नरेंद्र मोदी यांची झाली आहे. मोदी फक्त स्वत:वर प्रेम आणि विश्वास ठेवतात.

तसेच नरेंद्र मोदी कोण आहेत जे मी भारतीय असल्याचे ठरवतील अशा शब्दात राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. भारतातील लोकांना ते भारतीय असल्याचे दाखवून द्यावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना हा भारतीय कोण आहे की कोण नाही हा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल ही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. मला माहिती आहे मी भारतीय आहे तर मला कोणाला ही गोष्ट खरं करुन दाखवण्याची गरज नाही आहे.(Delhi Assembly Election 2020: भाजपची जय्यत तयारी; नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील 10 दिग्गज नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार)

ANI Tweet:

एवढेच नव्हे तर मोदी यांना बेरोजगारी आणि नोकऱ्यांच्या बाबत प्रश्न विचारले असता ते त्याकडे दुर्लक्ष करतात. एनआरसी आणि सीएए हे तुम्हाला नोकऱ्या मिळवून देणार नाही आहेत. जम्मू आणि कश्मीर मधील स्थिती आणि आसाम मधील लोकांना सुद्धा रोजगार मिळू शकत नाही. राहुल गांधी यांनी केरळ येथे नागरिकत्व सुधारणा सीएएच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाअंतर्गत वायनाड येथे संविधान बचाओ मार्चचे नेतृत्व केले. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींची उपस्थिती दिसून आली.