Nitin Gadkari (PC - ANI/Twitter)

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज पुन्हा आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये (Lok Sabha Election) आपण प्रचारामध्ये ना बॅनरबाजी करणार ना चहाला कोणाला कुठे नेणार असं म्हटलं आहे. ज्यांना मतदान करायचं आहे ते माझ्यासाठी मतदान करतील असं म्हणत सारा निर्णय मतदारांवर सोडला आहे. वाशिम मध्ये National Highway projects च्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. आरएसएस पासून त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात झाली पुढे ते भाजपा महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर पोहचले. 66 वर्षीय गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरतात. 'आगामी लोकसभेसाठी आता मी ठरवलं आहे की आपण पोस्टर, बॅनर्स लावणार आहे. लोकांना चहा देणार नाही. तसेच लाच घेणार नाही आणि लोकांना घ्यायलाही देणार नाही असं ते म्हणाले आहेत.आपण प्रामाणिक पणे काम केले आहे. ' असं त्यांनी वाशिम मध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीला गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते की, त्यांनी मतदारांना एकदा मटण दिले होते, पण तरीही निवडणुकीत पराभव झाला. Nitin Gadkari On Congress: 'विहिरीत उडी मारून मरणे पसंत करेन'; काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांचं उत्तर .

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना, या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये - मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि झारखंडमधील निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांसोबत होण्याची शक्यता आहे.