Raj Thackeray | (Photo Credits- Facebook @MNS Adhikrut)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राज हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजेच हा विदर्भ दौरा. आज सकाळी मुंबईवरून ट्रेनने राज यांचे अमरावतीत आगमन झाले. त्या निम्मिताने मनसे कार्यकर्त्यांनी राज यांचे दमदार स्वागत केले. मोठ्या संखेने कार्यकर्ते अमरावती स्थानकात उपस्थित होते. आज अमरावतीला राज अंबा महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

पहा राज ठाकरेंचे अमरावतीत स्वागत झाले तो क्षण

राज ठाकरेंनी अलीकडेच भारतीय जनता पक्षा विरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणातून आणि व्यंगचित्रातून ते सरकारला लक्ष करत आहेत. विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला बनला असून राज आपला करिष्मा कसा दाखवतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. मनसेला आघाडीत घेण्याबाबत कांग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये विचार सुरु असताना राज यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नक्की वाचा: राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात काय बोलणार? महाराष्ट्राचे लक्ष.

विदर्भ दौऱ्यात राज हे अनेक पधाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार असून पक्षात अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्याची शक्यता आहे. तसेच जाहीर सभा आणि पत्रकार परिषदातून ते सरकार विरुद्ध काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.