Photo Credit- X

Manipur Violence: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्या गृहमंत्री अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय मणिपूरमधील अस्थिर(Manipur Violence) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. (Maharashtra Assembly Elections 2024: अमित शहांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना)

रॅली रद्द करून गृहमंत्री महाराष्ट्रातून दिल्लीत

मणिपूरमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील निवडणूक रॅली रद्द केल्या होत्या. नागपुरातून ते दिल्लीला परतले. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते विदर्भात चार सभा घेणार होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मंत्री स्मृती इराणी या रॅलींमध्ये सहभागी झाल्या आहेत. मणिपूरमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांवर लक्ष दिलं जात आहे.(Manoj Jarange Patil: 'मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा'; मनोज जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना भावनिक आवाहन)

प्रकरण काय आहे?

मणिपूरमधील जिरीबाम येथून सोमवारपासून बेपत्ता झालेल्या सहा जणांपैकी एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह नदीत तरंगताना आढळला. रविवारी सकाळी येथे आणखी एका महिलेचा मृतदेह सापडल्याचा दावा केला जात आहे. जिरीबामच्या सीमेवर असलेल्या आसाममधील कचार जिल्ह्यातील बराक नदीतून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. मृतदेह खाली होता तिथून आणखी तीन मृतदेह सापडले. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसली तरी बेपत्ता झालेल्या सहा जणांपैकी हा एकाचा असल्याचा संशय आहे.

यामुळे शनिवारी रात्री मणिपूरमधील संतप्त जमावाने इंफाळ खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आणखी तीन आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरांना आग लावली. तसेच सुरक्षा दलांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.