Lok Sabha Elections 2019: चौकीदार शोधायला नेपाळला जाईन, देशात पंतप्रधान हवा चौकीदार नको: हार्दिक पटेल
Hardik Patel (Photo Credits: File Photo)

देशभरातील 117 जागांसाठी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections 2019) तिसऱ्या टप्प्यातील(Third Phase Voting) मतदान मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या निमित्ताने वेगवेगळे राजकारणी, सेलिब्रिटी,यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सामान्य जनतेलाही न चुकता मत द्या असे आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी देखील नुकतंच विरंगम (Viramgam) मतदान केंद्रावर मत दिले, बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  (Prime Minister Narendra Modi) 'मै भी चौकीदार' विधानावर टीका केली आहे.

"चौकीदार हवा असेल तर मी नेपाळ ला जाईन, देशासाठी पंतप्रधान हवा आहे, देशातील अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था भक्कम करू शकेल तसेच तरुणाईसाठी आणि सैन्याला बळ देण्यासाठी काम करेल असा पंतप्रधान हवा आहे,त्यासाठी चौकीदाराची गरज नाही" असं मत त्यांनी यावेळी मांडलं.

ANI ट्विट (See Video)

हार्दिक पटेल यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सुरेंद्र नगर येथे एका सभेत बोलत असताना एका तरुणाने हार्दिक पटेलांच्या कानाखाली मारले होते. गुजरात: भरसभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली (Watch Video)

या घटनेचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी हार्दिक यांनाच ट्रोल करायला सुरवात केली आहे. नेपाळच्या बाबतीत हार्दिक यांनी केलेले हे विधान अपमानास्पद असल्याचे मत देखील मांडले जातेय.

हार्दिक पटेलना नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल

आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, सोमवारी होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.