पश्चिम बंगाल: मतदान केंद्रावर काँग्रेस-तृणमुल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा मृत्यू
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

पश्चिम बंगाल (West Bengal) येथे मतदान केंद्रावर काँग्रेस (Congress) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (23 एप्रिल) राडा झाला. यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा भांडणात मृत्यू झाला आहे.

मुर्शिदाबाद मतदारसंघातील बालीग्राम मधील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये जबर राडा झाला. त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदाराला या दोघांच्या मारहाणीत गंभीर जखम होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(हेही वाचा-केरळ: मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून मतदाराला धक्का; जागेवरच मृत्यू)

या प्रकरणामुळे गावातील मंडळींनी संताप व्यक्त केला आहे. तर दोन गटातील भांडणाचे कारण अद्याप कळलेले नाही. मात्र सामान्य नागरिकाचा जीव गेल्याने कार्यकर्त्यांचे असे वागणे निषेधार्ह आहे असे म्हटले आहे.