केरळ: मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून मतदाराला धक्का; जागेवरच मृत्यू
Lok Sabha Elections voting | (Only representative image)

Lok Sabha Elections 2019: केरळ (Kerala) राज्यातील एका ज्येष्ठ नागरिक मतदाराचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. या मतदारास मतदानादरम्यान कळले की त्याचे मतदार यादीत (Voters List) नावच नाही. मतदार यादीत आपले नाव नसल्याचे ऐकून या ज्येष्ठ मतदारास बसलेल्या धक्क्यात त्याचा मृत्यू झाला. केरळमध्ये अशाच प्रकारे इतर दोन ज्येष्ठ नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.मृत्यू पावलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे नाव मणी असे असल्याचे समजते. त्याचे नाव मतदार यादीत नव्हते.

दरम्यान, अन्य दोन ज्येष्ठ नागरिक असलेले मतदारही आपापल्या मतदारसंघात मतदान असलेल्या ठिकाणी मतदान केंद्रावर गेले होते. त्यापैकी विजय पनूर (वय 65 वर्षे) नावाचे मतदार हे पनूर येथील चोकली राम विलासम एलपी स्कूल ( Chokli Rama vilasam LP School) मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत होते. दरम्यान, मतदान केल्यानंतर काही क्षणातच ते खाली कोसळले. पनूर हे मतदानकेंद्र वतकारा लोकसभा मतदारसंघ (Vatakara constituency) अंतर्गत येते. पोलिसांनी सांगितले की, विजय पनूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (हेही वाचा, 'कोणाच्या तालावर नाचणारे 'भक्त' बनू नका'; व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान मोदी, भाजपवर हल्ला)

दुसरी घटना वठानमठ्टा जिल्ह्यातील वाडसेरीकारा येथील मतदान केंद्रावर घडली. पापाचान (वय 80 वर्षे) हे मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आले होते. मतदानादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त न्यूज 18 डॉट कॉमने दिले आहे.