Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने रविवारी आपल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्या 20व्या यादीमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी 6 लोकसभा उमदेवारांची नावे घोषित केली आहेत. त्याचसोबत पश्चिम बंगाल येथे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजने हरियाणा येथील हिसार मधून बृजेंद्र सिंह (Brijendra Singh) ह्याला तिकिट दिले आहे. तर बृजेश सिंह हा केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह (Birender Singh) यांचा मुलगा असून त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीरेंद्र सिंह यांनी असे म्हटले आहे की, भाजप पक्षाचे राजकरण हे वंशवादी शासनाविरुद्ध आहे. त्यामुळे माझ्या मुलाला तिकिट देण्यात येत असल्यास मी मंत्री पदाचा राजीनामा देणे योग्य असल्याचे म्हटले आहे. भाजपने जाहीर केलेल्यान नव्या यादीमध्ये हिसार येथून बृजेश सिंह, रोहतक येथू अरविंद शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रियांका गांधी निवडणुक लढवणार, पक्षात चर्चा सुरु: सूत्र)
BJP releases 20th list of 6 candidates in Haryana, MP and Rajasthan for #LokSabhaElections2019 . Union Minister Chaudhary Birender Singh's son Brijendra Singh to contest from Hisar (Haryana). One candidate for by-election to Uluberia Purba assembly constituency (WB) also named. pic.twitter.com/LliLITOxHd
— ANI (@ANI) April 14, 2019
Chaudhary Birender Singh (in file pic) offers to resign from the cabinet and Rajya Sabha to party president Amit Shah as his son Brijendra Singh gets ticket to contest Lok Sabha elections from Haryana's Hisar. pic.twitter.com/BwjKH0Vs6h
— ANI (@ANI) April 14, 2019
तर मध्य प्रदेशातून खजुराहो येथे विष्णु दत्त शर्मा, रतलाम येथून जीएस दामोर आणि धार येथून छत्तर सिंह दरबार यांना उमेदवारी दिली आहे. तर राजस्थान मधून दौसा येथून जसकौर मीणा यांना तिकिट दिले आहे.