Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रियांका गांधी निवडणुक लढवणार, पक्षात चर्चा सुरु: सूत्र
Priyanka Gandhi And Narendra Modi (Photo Credits-PTI)

Lok Sabha Elections 2019: वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी (Varanasi Lok Sabha Seat) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 26 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस (Congress) पक्षाच्या सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की, महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) सुद्धा वाराणसी येथे मोदी यांना टक्कर देण्यासाठी निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस पक्षात सध्या चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उत्तर प्रदेश येथील दौऱ्यानंतर प्रियांका गांधी यांनी वाराणसी येथून निवडणुक लढवणार असल्याचे संकेत दिले होते.

परंतु वाराणसी येथून निवडणुक लढवण्यापूर्वी प्रियांका गांधी सपा-बसपा पक्षासोबत चर्चा करणार आहे. कारण मोदी यांना वाराणसी येथे टक्कर देण्यासाठी एसपी-बीएसपी पक्ष आपला उमेदवाराला तिकिट न दिल्यास मोदी यांचा पराभव करण्यासाठी यश मिळेल. असे झाल्यास मोदी यांना मोठा धक्का बसेल. तर 2014 मधील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मोदी यांना विजय मिळणे कठीणच असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-नरेंद्र मोदी ठरले फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता; डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या, तर जॉर्डनची रानी तिसऱ्या क्रमांकावर)

फेब्रुवारी महिन्यात प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षात महासचिव पद आणि पूर्व युपीची कमान देण्यात आली होती. तेव्हापासूनच कार्यकर्ते प्रियांका गांधी यांनी निवडणुक लढावी अशी मागणी करत आहेत. मात्र प्रियांका गांधी यांनी याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.