Lok Sabha Elections 2019: काँग्रेस (Congress) पक्षाने अखेर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अजय राय (Ajay Rai) यांना वाराणसी (Varanasi) मतदासंघासाठी तिकीट देण्यात आले आहे. तर यापूर्वी वाराणसी येथून प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) निवडणुक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र गुरुवारी (25 एप्रिल) काँग्रेस पक्षाने वाराणसी येथील उमेदवाराचे नाव घोषित केले असून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टक्कर देणार आहेत.
यापूर्वी प्रियांका गांधी स्वत: वाराणसी येथून निवडणुक लढवतील असे संकेत दिले होते. परंतु आज अजय राय यांच्या नावाची घोषणा केली आहे. 2014 मध्ये सुद्धा अजय राय यांना वाराणसी येथून तिकिट देण्यात आले होते.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रियांका गांधी निवडणुक लढवणार, पक्षात चर्चा सुरु: सूत्र)
Ajay Rai to be the Congress candidate from Varanasi #LokSabhaElections2019 pic.twitter.com/SfF0bOtyRH
— ANI (@ANI) April 25, 2019
तर नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीए पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत. मोदी यांनी 2014 मध्ये वाराणसी येथे निवडणुक लढवत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध तीन लाख मतांनी विजयी झाले होते. तर अजीत राय यांना जवळजवळ 75 हजार मते मिळाली होती.