Lok Sabha Election 2019: आगमी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने सोमवारी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम आणि लक्षद्वीप येथील 56 उमेदवार निवडणुक लढवणार आहेत.
केंद्र सरकारमध्ये भाजप देशव्यापी आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यात न आल्याने काँग्रेसने त्यांच्या पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. तर सोमवारी जाहीर केलेल्या पाचव्या यादीत आंध्र प्रदेशातील 22, आसाम 5, ओडिशा 6, तेलंगणा 8, उत्तर प्रदेश 3, पश्चिम बंगाल 11 त्याचसोबत लक्षद्वीप 1 अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर)
ANI ट्वीट:
Congress party releases fifth list of 56 candidates for upcoming #LokSabhaElections2019 . Madhu Yashki Goud to contest from Nizamabad, Telangana, N Uttam Kumar Reddy from Nalgonda. Abhijit Mukherjee to contest from Jangirpur, West Bengal & Adhir Ranjan Chowdhary from Berhampore. pic.twitter.com/CwhKfRerGi
— ANI (@ANI) March 18, 2019
Congress party releases list of 36 candidates for elections to the Odisha legislative assembly. pic.twitter.com/HixKZ0AmSH
— ANI (@ANI) March 18, 2019
तर ओडिशा येथून काँग्रेस पक्षाचे 36 उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. तसेच अधीर रंजन चौधरी बेहरामपूर येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये केरळमधील 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसगढ येथील 5, अरुणाचल प्रदेश मधील 2 आणि अंदमान-निकोबार येथे 1 अशा 27 जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुक लढवणार आहेत