के. चंद्रशेखर राव पुन्हा तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान!
K Chandrasekhar Rao as the Chief Minister of Telangana (photo Credits : ANI)

K Chandrasekhar Rao as the Chief Minister of Telangana :  तेलंगणा राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये  तेलंगणा राष्ट्र समिती  (TRS)या पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. पक्षप्रमुख चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao )  यांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता येणार आहे. आज राजभवनात के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  119 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये TRS 88,  CONG+ 19,  भाजप (BJP)1 इतर(OTH)11 जागंवर निवडून आले. Assembly Elections Results 2018 : मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड विधानसभा निवडणुक निकालांमध्ये कॉंग्रेसची मुसंडी, तेलंगणामध्ये TRS तर मिझोराम MNF ने जिंकले

तेलंगणामध्ये 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये TRS सत्तेमध्ये आली होती. KCR म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्या हातामध्ये सत्ता आली होती. राज्यात आज 7 डिसेंबर 2018 ला मतदान पार पडलं. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुकांना सामोरं जाण्याचा धाडसी   निर्णय घेतला. सत्तेतीलTRSला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा, जनसमिती आणि सीपीआय एकत्र आले होते मात्र जनतेने चंद्रशेखर यांच्याबाजुने मतदान केले. चंद्रशेखर राव 50,000 मतांनी जिंकून आले.