काँग्रेस विरुद्ध भाजप | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Assembly Elections Results 2018 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana), छत्तीसगड (Chhattisgarh) , मिझोराम (Mizoram ) या   पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे चित्र सुमारे 24 तासांनंतर स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये कॉंग़्रेसने मुसंडी मारली आहे. कॉंग्रेस हा मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पाचपैकी तीन राज्यात कॉंग्रेस आणि अन्य दोन राज्यात स्थानिक पक्षाच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. Assembly Elections Results 2018 : मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय झालं?

मध्यप्रदेश

मध्यप्रदेशामध्ये 230 जागांवर निवडणूक झाली. त्यापैकी कॉंग्रेसच्या पारड्यात 114, भाजपाला 109 आणि अन्य पक्षाला 7 जागा मिळाल्या आहेत. मात्र बहुमतासाठी 116 ही मॅजिक फिगर गाठणं कोणत्याच पक्षाला जमलं नाही. कॉंग्रेस बहुमतापासून अवघ्या 2 जागा दूर राहिला आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये भाजपाला 73, कॉंग्रेसला 99 इतर पक्षाच्या पारड्यात 27 जागा आल्या आहेत.

तेलंगणा

तेलंगणामध्ये TRS पक्षाला बहुमत मिळालं आहे. या पक्षाला सर्वाधिक म्हणजे 88, कॉंग्रेसला 19 , भाजपाला केवळ 1 तर इतर पक्षाला 11 जागा मिळाल्या आहेत. TRS प्रमुख के.चंद्रशेखर राव हे 50,000 मतांनी जिंकून आले आहेत. जिंकल्यानंतर राव कार्यालयाच्या मुख्यालयामध्ये आले होते.

छत्तीसगड

छ्त्तीसगड्मध्येही कॉंग्रेला बहुमत आहे.छत्तीसगडमध्ये 90 जागांवर ही निवडणूक पार पडली होती.  त्यापैकी कॉंग्रेसला 68 ,भाजपाला 15, BSP +  पक्षाला 2 आणि इतर पक्षाच्या पारड्यात 5 जागा  आल्या आहेत.  मागील 15 वर्ष येथे भाजपाची सत्ता होती. कॉंग्रेसने या राज्यात बहुमत मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला आहे. Chhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा

मिझोराम

मिझोराम राज्यात 10 वर्षांची कॉंग्रेसची सत्ता हाणून पाडण्यामध्ये स्थानिक पक्ष ला यश आलं आहे. MNF पक्षाचा मिझोराममध्ये 40 पैकी 26 जगांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे Zoramthanga त्यांची सत्ता स्थापन करणार असून कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे Mizo National Front च्या पक्षाची बाजी

आता सत्तास्थापनेसाठी कोणता पक्ष पुढे येणार? सत्तेची गणितं कशी रंगणार हे पाहणं उत्सुकतेच ठरलं आहे. भाजपाचा विधानसभा निवडणूकीतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. मात्र मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.