Chhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा
मुख्यमंत्री रमन सिंग (फाइल फोटो)

छत्तीसगड (Chhattisgarh) चे मुख्यमंत्री रमन सिंग (Raman Singh) यांनी विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) भाजपा (BJP) चा पराभव स्वीकार केला आहे. सलग चौथ्यांदा विजयी होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले असून, त्यांनी राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनाम पाठवून दिला आहे. हाती येत असलेला निकाल पाहून रमन सिंग म्हणाले, ‘जितकी शक्य होईल तितकी आम्ही जनतेची सेवा केला. पक्षाच्या विजयाचे श्रेय जसे मी घेतले तसेच पक्षाच्या पराभवाची जबाबदारीही मी स्वीकारत आहे.’ याचसोबत त्यानी कॉंग्रेसचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदनदेखील केले.

छत्तीसगडमध्ये 90 जागांवर ही निवडणूक पार पडली होती. हाती येत असलेला निकाल पाहून छत्तीसगड राज्यात भाजपाचा पराभव हा जवळजवळ अटळ आहे हे स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसने तब्बल 64 जागांवर आघाडी घेतली असून, भाजपा 17, बीएसपी 3 तर ओटीएचला 4 जागा मिळाल्या आहेत. छत्तीसगड 2013 मध्ये 49 जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 39 जागांवर विजय मिळाला होता. (हेही वाचा : छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा)

छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे रमण सिंह हे मुख्यमंत्री आहेत. आता काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाल्यावर छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामंध्ये भूपेश बघेल, टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू, डॉ. चरणदास महंत यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.