Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे Mizo National Front च्या पक्षाची बाजी
zoramthanga (Photo Credits- Twitter)

Mizoram Assembly Elections Results 2018: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल 2018 स्पष्ट झाला आहे. तर मिझोराम(Mizoram) येथे गेली दहा वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. मात्र मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचे  झोरमथंगा (Zoramthanga) यांचा दणदणीत विजय झाला आहे.

झोरमथंगा यांनी एएनआय (ANI) ला दिलेल्या वृत्तामध्ये विधानसभेच्या निवडणुकीबद्दल खूश आहेत. तर राज्यात प्रथम दारु बंदी,रस्ते दुरुस्ती आणि सामाजिक अर्थविकास सुधारणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच MNF पक्षाचा मिझोराममध्ये 40 पैकी 26 जगांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे Zoramthanga त्यांची सत्ता स्थापन करणार असून कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. ( हेही वाचा -Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे काँग्रेसचा दारुण पराभव)

यावेळच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्ये लढत दिसून आली. मात्र 2013 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत 34 जागा जिंकल्या होत्या.