Mizoram Assembly Elections Results 2018: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल 2018 हळूहळू स्पष्ट होताना दिसून येत आहे. तर मिझोराम(Mizoram) येथे गेली दहा वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.
मिझोरामचे काँग्रेस नेते, विद्यामान मुख्यमंत्री ललथनहवला (Lalthanhawla) यांचा विधानसभा निवडणूक 2018 मध्ये पराभव झाला आहे. तर गेली दहा वर्ष पु. ललथनहवला यांनी मुख्यमंत्री (CM) पदाचा कारभार सांभाळला होता. तसेच मतमोजणीच्या सुरुवातीला मिझो नॅशनल फ्रंट पक्ष (MNF) 29 जागांनी आघाडीवर दिसून आला. काँग्रेस (Congress) पक्षाला 6 जागांवर स्थान मिळाले आहे. मिझो नॅशनल फ्रंट 27, काँग्रेस 8, भाजप 1 आणि इतर 4 अशी कुरघोडी झाली आहे. ( हेही वाचा- Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे नॅशनल फ्रंट आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर)
यावेळच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्ये लढत दिसून आली. मात्र 2013 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत 34 जागा जिंकल्या होत्या.