Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम (Mizoram) विधानसभा निवडणूक निकाल 2018 आज लागणार असून सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर 40 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र एक्झिट पोलनुसार मिझोराम येथे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) पक्ष आघाडीवर दिसून येत आहे.
मिझोराम राज्यात पीपल्स कन्फरन्स, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये निवडणुकीचा निकाल रंगत आहे.मात्र अटीतटीची लढत मिझो नॅशनल फ्रंटआणि काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळत आहे.
या राज्यात 40 जागांसाठी मतदान केले गेले.तर 209 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले.या निवडणुकीसाठी तेथील एकूण 7,70,395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 374,496 पुरुष, 3,94,897 महिला मतदारांचा समावेश होता. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.