मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आज कॉंग्रेस पक्षातील युवा फळीतील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट दिल्लीमध्ये झाली. त्यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून राजीनामा शेअर केला आहे. मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशामध्ये (Madhya Pradesh) भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरू असल्याची चर्चा होती. आता अखेर त्याला यश मिळाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता ज्योतिरादित्य सिंधिया भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. 'मी मागील वर्षभरापासून त्रस्त होतो.कॉंग्रेस पक्षामध्ये राहून मी देशाची सेवा करू शकत नाही' असं त्यांनी पत्रामध्ये लिहलं आहे. ट्वीटमध्ये तो कॉंग्रेस प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून आहे.
दरम्यान मध्यप्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्री विराजमान केल्यापासून सिंधिया नाराज होते. प्राप्त माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपा राज्यसभेवर पाठवू शकते. सोबतच संसदेच्या अधिवेशनानंतर होणार्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी 114 जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाच्या 107 जागा आहे. बसपाच्या 2, समाजवादी पक्षाची 1आणि चार अपक्ष आमदार असं सध्याचं राजकीय बलाबल आहे. मध्यप्रदेश: ऑपरेशन लोटसला धक्का; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले 16 मंत्र्यांचे राजीनामे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांचं ट्वीट
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 10, 2020
आज ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांचा स्मृतिदिन आहे. सिंधिया कुटुंबाचं गांधी कुटुंबासोबत कॉंग्रेस पक्षासोबत निकट संबंध होते. आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याने हा कॉंग्रेसला मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा तातडीने मंजूर देखील केला आहे.