Congress: काँग्रेस पक्षापुढे राजकारणासोबतच पाठीमागील 100 वर्षात प्रथमच असे संकट, घ्या जाणून
Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इंडियन नॅशनल काँग्रेस (Indian National Congress) हा पक्ष भारतातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक पक्ष. या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसह स्वतंत्र्य भारताच्या पायाभरणीसह अनेक चढउतार पाहिले. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ सत्तेवर राहिलेला पक्ष आज विरोधी पक्षाची भूमिका निभावतो आहे. फार काळ विरोधी बाकावर नसलेला काँग्रेस पक्ष (Congress Party) प्रथमच सलग दुसऱ्यांदा (सन 2014 ते आतापर्यंत) विरोधी पक्षाची भूमिका निभावतो आहे. दरम्यान, या पक्षाला लोकसभा निवडणूक 2014 पासून झालेल्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणावर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ही आव्हाने राजकीय तर आहेतच. परंतू, आर्थिक पातळीवरील (Economic Crisis) देखील आहेत. कदाचित काँग्रेस समोर पाठिमागील 100 वर्षांमध्ये प्रथमच अशा स्वरुपाचे संकट आले असेल. काँग्रेस कोषाध्यक्ष पवन कुमार बंसल (Pawan Kumar Bansal) यांनी नुकतीच ही माहिती दिली.

काँग्रेस कोषाध्यक्ष पवन कुमार बंसल यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेस पक्ष सध्या कमित कमी खर्च करण्याचा विचार करतो आहे. मी पक्षाचा एक एक रुपया जपून वापरण्याचा प्रयत्न करतो आहे'. बंसल यांच्या विधानावरुन लक्षात येते की काँग्रेस पक्ष मोठ्या आर्थिक आव्हनांचा सामना करत आहे. आर्थिक संकटामुळे काँग्रेस पक्षाच्या सचिवांपासून ते महासचिवांपर्यंत सर्व पार्टी पदाधिकाऱ्यांना खर्च जपून करण्यासोबतच प्रतिवर्ष कमा 50,000 रुपयांचा पक्ष निधी जमा करण्याचे अवाहन केले आहे. (हेही वाचा, Sonia Gandhi In CWC: काँग्रेस पक्षात मोठ्या सुधारणांची गरज- सोनिया गांधी)

Congress | (Photo Credit: File Image)

दरम्यान, काँग्रेस पक्षाने सचिवांना विमान प्रवासाऐवजी रेल्वेने प्रवास करण्याच्याही सुचना दिल्या आहेत. तसेच, जर गरज पडलीच तर सर्वात कमी खर्चाने विमानप्रवास करण्याबाबत सांगण्यात आले आहे. शक्यतो खासदार, आमदार, महासचिवांनी स्वखर्चाने हवाई प्रवास करावा, असेही पक्षाने अवाहन केले आहे.

Congress | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस सचिवांना 1400 किमी पर्यंत आवश्यक रेल्वे प्रवास निधी, 1400 किमी पेक्षा अधिक प्रवासासाठी सचिवांना सर्वात कमी विमान प्रवासाचा खर्च दिला जाईल. विमान प्रवास निधी महिन्यातून दोन वेळा दिला जाईल. जर रेल्वे प्रवासाचे भाडे हवाई प्रवासापेक्षा अधिक असेल तर हवाई प्रवासाचे भाडे दिले जाईल. कमी पैशांमध्ये सचिव हवाई प्रवास करु शकतात. दरम्यान, कॅन्टीन, स्टेशनरी, वीज, वृत्तपत्र, इंधन आदी खर्च एआसीसी पदाधिकाऱ्यांनी स्वात:हून कमी करायला हवा असेही पक्षाने म्हटले आहे. पक्षाने म्हटले आह की, सचिव आणि महासचीव यांच्या भत्त्यांमध्ये अनुक्रमे 12,000 रुपये आणि 15,000 रुपये कपात केली जाईल, असे पवन बन्सल यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदारांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी प्रतिवर्ष कमीत कमी 50,000 रुपयांचे योगदान पक्षाला द्यावे तसेच, पक्ष समर्थकांकडून प्रतिवर्ष 4,000 रुपये निधी जमा करण्यात यावा.