Sonia Gandhi In CWC: काँग्रेस पक्षात मोठ्या सुधारणांची गरज- सोनिया गांधी
Sonia Gandhi | (File Photo)

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल (West Bengal), केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), असाम (Assam) आणि झारखंड (Jharkhand) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress Party) पक्षाला मोठ्या प्रराभवास सामोरे जावे लागले. या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या वर्किंमग कमिटीची (CWC) एक बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाला आलेल्या अपयशाचा आढावा घेण्यात आला. या वेळी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi यांनी म्हटले की, पक्षात अनेक गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकात पक्षाला आल्या मोठ्या अपयशापासून आपण बरेच काही शिकले पाहिजे. पक्षाच्या अपयशामुळे आपण निराश आहोत असे म्हणने फारच थोडे असेल असेही सोनिया गांधी म्हणाल्या. पक्षाला बसलेल्या प्रत्येक फटक्याचा गांभीर्याने विचार करु. त्यासाठी लवकरच एका समितीची स्थापना करुन अहवाल माहवला जाईल असेही गांधी म्हणाल्या.

अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशाचा नुकताच आढावा घेतला. त्यांनी असम आणि केरळ राज्यात झालेला पराभव आणि पश्चिमबंगालमध्ये एकही जागा न मिळाल्याबद्दल अहवाल देण्यासाठी एक समिती बनविण्याचे म्हटले. असम आणि केरळमध्ये पक्षाला अत्यंत निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागल्याचेही त्या म्हणाल्या. कोरोना नियंत्रणात मोदी सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे हे संकट नियंत्रणासाठी एका सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. कोरोना हे एक महाकाय आरोग्य संकट असल्याचे सांगत सोनिया गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांनी हे संकट नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे अवाहन केले.

वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले की, आम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, आम्हाला केरळ आणि असम राज्यात विद्यमान सरकारांना पराभूत करण्यात का अपयश आले. बंगालमध्ये तर आपल्याला खातेही उघडता आले नाही. असे का घडले असावे. या प्रश्नांसोबतच काही कारणेही असतील. काहीही असलेल तरी आपल्याला वास्तवतेचा स्वीकार करावाच लागेल. जर आपण वास्तवतेचा सामना करत नसू तर त्याचा अर्थ आम्ही वारंवार आलेल्या अपयशातून काहीही बोध घेत नाही. (हेही वाचा, Mamata Banerjee यांनी सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना लिहिले पत्र; BJP विरुद्ध लढण्यासाठी एकजूट होण्याचे केले आवाहन )

दरम्यान, जेव्हा आम्ही 22 जानेवारीला एक बैठक घेतली होती तव्हा आपण निर्णय घेतला होता की, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक जूनच्या मध्यावर पूर्ण केली जाईल. निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणूक कार्यक्रम तयार केला आहे. वेणुगोपाल कोविड 19 आणि निवडणूक परिणांमवर चर्चा झाल्यानंतर त्याबाबत माहिती देतील असेही सोनिया गांधी यांनी सांगितले.