File Image | Amit Shah | PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिले असता मोदी सरकारसाठी ऑक्टोंबर महिना फारच निराशाजनक ठरला आहे. या महिन्यातील एकूणच आकडेवारी पाहिली असता अर्थव्यवस्था वाईट परिस्थितीतून जात असल्याचे समोर आले आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा त्रास अधिक वाढला आहे. तर औद्योगिक उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाक 1.1 टक्के घट झाली आहे. गेल्या सात वर्षांमधील यंदाचे हे अत्यंत खराब प्रदर्शन आहे. तसेच दोन वर्षांमधील औद्योगिक उत्पादनात झालेली घट ही पहिल्यांदाच दिसून आली आहे. आकडेवारीनुसार मॅन्युफॅक्चरिंग, वीज आणि खाण काम क्षेत्रातील वाईट प्रदर्शनामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.

तसेच ऑटो इंडस्ट्रीत अद्याप मंदीचेच वातावरण आहे. खरतर वाहन निर्मात्यांच्या संघटनेने असे म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यात वाहन विक्रीच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. सियाम यांच्या आकडेवारीनुसार सार्वजनिक वाहनांची विक्री 23.69 टक्क्यांनी घसरली आहे.तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट रेटिंग ऐजंसी मूडीद यांनी भारताच्या जीडीपी ग्रोथचा अनुमान पुन्हा एकदा कमी झाला आहे. ताज्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ 5.8 टक्के राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही मूडीज यांनी जीडीपी ग्रोथ 6.2 टक्के असेल अशी शक्यता व्यक्त केली होती.(Go Back Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियातून विरोध; ट्विटरवर #TNwelcomesXiJinping, #GoBackModi हॅशटॅग ट्रेंड)

त्याचसोबत भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ही मूडीज यांनी चेतावणी दिली आहे. कारण अर्थव्यवस्थेत मंदी अशीच कायम राहिल्यास राजकोषीय नुकसान कमी करण्याचा झटका बसेल. त्याचसोबत कर्जाची वाढ अधिक होईल.एवढेच नाही तर सप्टेंबर महिन्यातील जीएसटी कलेक्शनच्या आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जीएसीट कलेक्शन एकूण 91,916 करोड रुपये असल्याचे समोर आले आहे.