Delhi Assembly Election 2020 Dates: दिल्ली विधानसभा निवडणूक 8 फेब्रुवारीला; मतदान निकाल 11 फेब्रुवारी दिवशी!
Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

Delhi Vidhan Sabha Election 2020 Dates: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आगामी निवडणूकांसाठी आज निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  केंद्रीय निवडणूक आयुक्त  सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये  8 फेब्रुवारी दिवशी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक एका टप्प्यात पार पडणार आहे. तर मतदानाचा अंतिम निकाल फेब्रुवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता असून आपचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मुख्यमंत्रीपदी आहेत.

दरम्यान 90,000 कर्मचारी या निवडणूक कार्यक्रमांमध्ये काम करणार आहेत. सारी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. महिला, ज्येष्ठ यांच्यासाठी खास सोय करण्यात येणार आहे.  2689 ठिकाणी मतदन केंद्र असणार आहेत.  अंदाजे 1.46 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क  बजावू शकतात.  दिल्लीमध्ये आजपासून (6 जानेवारी) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 दिल्ली विधानसभा 2020 निवडणूक कार्यक्रम 

अधिसूचना जारी - 14 जानेवारी

नॉमिनेशन भरण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी

फॉर्म मागे घेण्याची तारीख - 24  जानेवारी

मतदान तारीख - 8 फेब्रुवारी

मतदान निकाल - 11 फेब्रुवारी

एकूण 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत सद्यास्थितीत पक्षीयबलाबल पाहता आम आदमी पक्ष (आप) 62, भाजप 4 आणि इतर पक्षाचे 4 सदस्य आहेत. या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही नवनिर्वाचीत आम आदमी पक्ष, सत्ताधारी काँग्रेस, विरोधात आसलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार लढाई झाली होती. ही चुरस यंदाच्या निवडणूकीमध्ये दिसणार आहे. इंदिरा गांधीं प्रमाणे माझीही हत्या होईल म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांचे चोख उत्तर.

गेल्या वेळी 14 फेब्रुवारी 2015 या दिवशी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते.