दिल्ली विधानसभा निवडणूकीत 80 वर्षावरील मतदारांसाठी खास सोय, 'पोस्टल बॅलेट' च्या माध्यमातून बजावू शकता मतदानाचा हक्क
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणूक येत्या 8 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने आज केली आहे. तर दिल्लीत 70 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून त्याचा निकाल 11 फेब्रुवारी रोजी लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात सुरुवाती झाली आहे. या दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी असे सांगितले आहे की, वय वर्ष 80 किंवा त्यापेक्षा अधिक वय आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदानासाठी खास सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मतदारांना थेट मतदान केंद्र गाठावे लागणार नाही आहे.

निवडणूकी दरम्यान मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी असे सांगितले आहे की, अनुपस्थित मतदारांसाठी ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जे मतदार शारीरिकरित्या काही समस्यांचा सामना करत आहेत त्यांना मतदान करता येणार आहे. PWD आणि 80 वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना व्यक्तिगत पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्का बजावता येणार आहे. यंदाच्या दिल्लीतील मतदानासाठी 1.46 करोड मतदार घरबसल्या मतदान करु शकणार आहेत.(Delhi Assembly Election 2020 Dates: दिल्ली विधानसभा निवडणूक 8 फेब्रुवारीला; मतदान निकाल 11 फेब्रुवारी दिवशी!)

एकूण 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत सद्यास्थितीत पक्षीयबलाबल पाहता आम आदमी पक्ष (आप) 62, भाजप 4 आणि इतर पक्षाचे 4 सदस्य आहेत. या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही नवनिर्वाचीत आम आदमी पक्ष, सत्ताधारी काँग्रेस, विरोधात आसलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार लढाई झाली होती. ही चुरस यंदाच्या निवडणूकीमध्ये दिसणार आहे. गेल्या वेळी 14 फेब्रुवारी 2015 या दिवशी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते.