जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तर अमेरिका, इटली येथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच भारतावर सुद्धा कोरोनाचे महाभयंकर संकट ओढावल्याने त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जगभरातील विविध ठिकाणी रमजानच्या महिन्याला सुद्धा सुरुवात झाली आहे. रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी फार महत्वाचा मानला जातो. तसेच या काळात अल्लाह स्वर्गाचे दरवाजे खुले करतो असे ही मानले जाते. तर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी रमजानचा महिना प्रार्थना आणि आशिर्वादाचा आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्यात कोरोना व्हायरसपासून जगभरातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याची सुद्धा ही वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या रमजानवर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांना मशीदीत जाऊन नमाज अदा करता येणार नाही. तसेच इफ्तार पार्टीचे आयोजन नागरिकांनी घरीच करावे असे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजिक नेते आणि केंद्राने नागरिकांना नमाज अदा करताना घरीच सर्वोतोपरी काळजी घ्यावी असे ही नकवी यांनी म्हटले आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना हा स्वयंशिस्तीचा , नियमाचा मानला जातो. तसेच या काळात मुस्लिम बांधव रोझा ठेवून दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. (रमजानच्या महिन्याला आजपासून सुरुवात, संध्याकाळी 7 वाजता कर्फ्यू लागू होणार असल्याने मशिदीत न जाण्याचे आवाहन- असदुद्दीन औवेसी)
#Ramzan is the time to offer prayers&seek blessings. It's also the time to pray for safety of people across the world, from #Coronavirus. Religious&social leaders & centre have appealed to people to offer prayers with prevention&precaution at home: Union Min Mukhtar Abbas Naqvi pic.twitter.com/RQRSlG69X1
— ANI (@ANI) April 25, 2020
दरम्यान, देशभरात साजरा करण्यात येणाऱ्या रमजान सणाच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या आहेत. तसेच कोरोनाची परिस्थिती पाहून नागरिकांना यंदाचा रमजानचा सोहळा सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करुन साजरा करावा असे ही सांगण्यात आले आहे.