नरेंद्र मोदी 'रावण' तर राहुल गांधी 'राम', मध्य प्रदेशात राजकीय रामायणाची पोस्टरबाजी
नरेंद्र मोदी रावण तर राहुल गांधी राम, मध्य प्रदेशात राजकीय रामायणाची पोस्टरबाजी (फोटो सौजन्य-ट्वीटर)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर राफेल करारावरुन (Rafel Deal) निशाणा साधत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोस्टरबाजीवर आता राजकीय रामायण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) पाहायला मिळाले आहे. भोपाळ (Bhopal) मध्ये एका ठिकाणी काँग्रेस (Congress) पक्षाचे पोस्टर झळकविण्यात आले आहे, त्यामध्ये मोदी हे रावण आणि राहुल गांधी हे राम असल्याचे रामायण दाखवण्यात आले आहे. तसेच राहुल गांधी हे मोदी यांच्यावर निशाणा धरत बाण मारतानाचे चित्र या पोस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

गुरुवारी (7 फेब्रुवारी) रोजी राहुल गांधी आणि मोदी यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे राफेल करारावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची झोड मोदींवर करत मध्य प्रदेशात त्याबाबत पोस्टर झळकवण्यात आले आहेत. या पोस्टरवर भाजप (BJP) पक्षाचे बडे नेते दिसून येत आहेत.(हेही वाचा-नरेंद्र मोदी महिषासूर, प्रियंका गांधी दुर्गामाता: पोस्टरबाजीमुळे भाजप पक्षात संतापाचे वातावरण)

तर पोस्टरवर 'चोरो तुम्हारी खैर नही, हम राम भक्त हैं, चोरों के अलावा किसी से बैर नही' अशा शब्दात मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच पोस्टरटच्या खाली राफेल विमान दाखवले असून 'चौकीदार चोर' असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राम मंदिरासह राफेलवरुन ही मोदींवर निशाणा साधला आहे.