नरेंद्र मोदी महिषासूर, प्रियंका गांधी दुर्गामाता: पोस्टरबाजीमुळे भाजप पक्षात संतापाचे वातावरण
राहुल आणि प्रियंका गांधी (फोटो सौजन्य- ट्वीटर)

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची रविवारी (3 फेब्रुवारी) रोजी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थित एका बिहारमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. ज्यामध्ये राहुल गांधी यांना भगवान राम यांचे रुप देण्यात आले होते. यावरुन भाजप पक्षावर निशाणा साधला होता. तर पोस्टरवर असे लिहिले होते की, वे राम नाम जपते रहे,तुम राम बनकर जियो रे. मात्र पुन्हा एकदा पोस्टरबाजीमुळे वाद निर्माण झाला असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 'महिषासूर'(Mahishasura)आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) ह्या 'दुर्गामाते' (Durga Mata)च्या रुपातील पोस्टर झळकावले आहेत. तर पोस्टरवर' राहुल-प्रियंका का सपना, खुशहाल हो देश अपना' असे लिहिण्यात आले आहे.

भाजप पक्षात पुन्हा एकदा या पोस्टरबाजीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण देत आम्ही केले नसल्याचे सांगितले जात आहे. बिहार येथील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनी भाजपच्या आरोपाला फेटाळून लावले आहे. तर झा यांनी विरोधाकांचा आम्हाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा पलटवार केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचसोबत भाजप पक्षाचे माजी मंत्री सम्राट चौधरी यांनी काँग्रेसवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा-राहुल गांधी म्हणजे 'रावण' आणि प्रियांका गांधी 'शूर्पणखा',भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान)

भाजप नेते सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 'रावण' (Ravana) असून प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) 'शूर्पणखा'(Shurpanakha) असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 'भगवान राम' (Bhagwan Ram) समान असल्याची उपमा दिली. सिंह यांनी, 'राहुल गांधी रावण असून त्यांची बहिण प्रियंका गांधी हिला शूर्पणखा हिच्या भूमिकेत पाठवले आहे'. असे वादग्रस्त विधान केले होते.